Mahiti Aayog Mumbai Bharti 2024 : राज्य माहिती आयोग, मुंबई अंतर्गत ‘या’ पदाकरिता नवीन भरती सुरु, अशा प्रकारे करा अर्ज !

Content Team
Published:
Mahiti Aayog Mumbai Bharti 2024

Mahiti Aayog Mumbai Bharti 2024 : राज्य माहिती आयोग, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या ई-मेलवर आपले अर्ज पाठवू शकता.

वरील भरती अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. या तारखे नंतर अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल, त्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ही भरती मुंबईत होत असून, उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज सचिव, राज्य माहिती आयोग (मुख्यालय), मुंबई, नवीन प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मंत्रालयासमोर, मुंबई- ४०००३२ या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

तर ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेलवर सादर करायचे आहेत. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज 15 मार्च 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत. भरती संबंधित तुम्हाला आणखी महिपती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://sic.maharashtra.gov.in/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर तर ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेलद्वारे सादर करा.

-अर्ज सादर करायची शेवटची तारीख 15 मार्च 2024 असून, उमेदवारांनी अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत. नंतर आलेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe