NFR Bharti 2024: उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या पदाच्या भरतीसाठी एकूण 5647 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 डिसेंबर 2024 आहे
NFR Bharti 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील:
उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) या पदासाठी एकूण 5647 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पदानुसारपात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 5647 |
एकूण रिक्त जागा | 5647 जागा |
शैक्षणिक पात्रता:
- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- संबंधित ट्रेड.मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय 3 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नोकरी ठिकाण:
पूर्वोत्तर फ्रंटीयर रेल्वे विभाग
अर्ज शुल्क:
जे उमेदवार अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणार आहे त्यांना खालील प्रमाणे अर्ज शुल्क द्यावा लागेल-
- जनरल / ओबीसी: ₹100/-
- एस सी / एसटी / पीडब्ल्यूडी / ई बी सी / महिला: यांना फी नाही.
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.
सूचना:
- या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करावा.
- अर्जामध्ये विचारलेली आवश्यक ती संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे भरावी.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने भरावा.
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
- या भरती बदल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://nfr.indianrailways.gov.in/ |