NHM Ahmednagar Bharti 2024 : NHM अहमदनगर येथे ‘या’ पदांसाठी सुरु आहे भरती; ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !

Content Team
Published:
NHM Ahmednagar Bharti 2024

NHM Ahmednagar Bharti 2024 : राष्ट्रीय आयुष अभियान अहमदनगर अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे असून. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे आपले अर्ज सादर करावेत.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, ती पुढीलप्रमाणे :-

वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी) : MBBS/BAMS. (MBBS उमेदवार उपलब्ध न झाल्यास BAMS उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल.)

दंत शल्यचिकित्सक : MDS/BDS

ऑडिओलॉजिस्ट : Degree in Audiology

श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्ट : 1 Year Diploma in Audiology

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक : Any Medical Graduate with MPH/MHA/MBA Health Care with relevant programmatic experience

वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार : B.com/M.com Tally ERP 9.0

एसटीएलएस : 10+2 in Science with Diploma or Certificate course in Medical Laboratory Technology or its equivalent
Minimum 2 years of experience of working a Bacteriological Laboratory of repute. Must be in possesion of permanent driving licence for two wheeler.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 46 वर्ष इतकी आहे.

अर्ज शुल्क

सामान्य उमेदवारांसाठी हे शुल्क 300/- रुपये असतील तर राखीव उमेदवारांसाठी 150/- रुपये इतके शुल्क आहे.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर म्हणजेच “जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर” येथे पोस्टाने सादर करायचे आहेत.

निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, अर्ज 20 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास nagarzp.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

-अर्ज पूर्ण भरलेला पाठवावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-तसेच अर्ज शेवटच्या तारखे अगोदर 20 मार्च 2024 पर्यंत दिलेल्या पत्यावर पाठवावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe