NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिकेत 620 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Published on -

NMMC Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 620 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

NMMC Bharti 2025 Details

जाहिरात क्रमांक: आस्था/01/2025

पदाचे नाव आणि इतर तपशील:

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.बायोमेडिकल इंजिनियर01
02.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
03.कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल इंजीनियरिंग)06
04.उद्यान अधीक्षक01
05.सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी01
06.वैद्यकीय समाजसेवक15
07.डेंटल हायजिनीस्ट03
08.स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ (G.N.M.)131
09.डायलिसिस तंत्रज्ञ04
10.सांख्यिकी सहाय्यक03
11.इसीजी तंत्रज्ञ08
12.सी. एस . एस. डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट)05
13.आहार तंत्रज्ञ01
14.नेत्रचिकित्सा सहाय्यक01
15.औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी12
16.आरोग्य सहाय्यक (महिला)12
17.बायो मेडिकल इंजिनिअर सहाय्यक06
18.पशुधन पर्यवेक्षक02
19.सहाय्यक परिचारिका मिडवाइफ (A.N.M.)38
20.बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप)51
21.शस्त्रक्रिया गृह सहाय्यक15
22.सहाय्यक ग्रंथपाल08
23.वायरमन (Wireman)02
24.ध्वनी चालक01
25.उद्यान सहाय्यक04
26.लिपिक टंकलेखक135
27.लेखा लिपिक58
28.शवविच्छेदन मदतनीस04
29.कक्षसेविका / आया28
30.कक्षसेविक (वॉर्ड बॉय)29
एकूण रिक्त जागा620 जागा उपलब्ध

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता एकदा नक्की तपासावी त्यानंतरच उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे?

जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

नोकरी ठिकाण:

नवी मुंबई

अर्ज शुल्क:

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹1000/-
  • मागासवर्गीय तसेच अनाथ उमेदवारांसाठी: ₹900/-

महत्वाची तारीख:

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मे 2025 आहे या तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा.

महत्त्वाच्या लिंक्स:

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळhttps://nmmc.gov.in/navimumbai/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe