NMMC Bharti Bharti 2024 : आरोग्य विभागा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे.
आरोग्य विभागा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत “वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स” पदांच्या एकूण 110 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 फेब्रुवारी 2024 असून, कार्यालयीन वेळेत उमेदवार हजर राहू शकतात.
वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक आहे. वैदयकीय अधिकारी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस असावा, लक्षात घ्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी अनिवार्य आहे. तसेच सरकारी/खाजगी क्षेत्रातील संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
स्टाफ नर्सपदासाठी उमेदवार 12वी पास आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफ डिप्लोमा किंवा B.Sc. नर्सिंग झालेला असावा, येथेही महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी अनिवार्य आहे.
यासाठी वयोमर्यादा अनिवार्य आहे, वैदयकीय अधिकारी 70 वर्षे तर स्टाफ नर्स खुल्या प्रवर्गसाठी 38 वर्षे, तर राखीव प्रवर्गसाठी 43 वर्षे इतकी आहे. ही भरती मुंबई येथे होत असून, उमेदवारांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614 या पत्त्यावर अर्जासह हजर राहायचे आहे. लक्षात घ्या मुलाखतीची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे. भरती संबंधित तुम्हला अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.nmmc.gov.in/ ला भेट द्या.
निवड प्रतिक्रिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखती द्वारे होणार आहे.
-मुलाखत वर दिलेल्या पत्त्यावर होणार आहे,
-मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
-मुलाखतीची तारीख 01 फेब्रुवारी 2024 आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.