ONGC Bharti 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून, तुम्ही खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करू शकता.
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित (ONGC Limited) अंतर्गत “कंत्राटी वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
या भरतीसाठी उमेदवार बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जन असला पाहिजे, पात्र उमेदवार अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात, लक्षात घ्या ही भरती मुंबईत होत असून अर्ज वर दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत. या भरती संबंधित तुम्हाला आणखी काही शंका असतील तर तुम्ही
अधिकृत वेबसाईट https://ongcindia.com/ ला भेट देऊ शकता.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करावेत.
-अर्ज 24 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.