Pune Bharti 2023 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आहे.
या भरतीअंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या 09 जागा भरल्या जाणार असून, यासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. ही भरती पुण्यात होत असून, उमेदवार ‘कुलसचिव, आरक्षण कक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – 411007’ येथे पोस्टाने अर्ज पाठवू शकतात.
लक्षात घ्या अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 दिवसांच्या आत आहे, यासाठी तुम्ही भरती सूचना काळजीपूर्वक वाचा, या भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड होणार असून, भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी mespune.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
येथे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून, वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
उमेदवारांनी लक्षात घ्या, येथे निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ज्या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड केली आहे त्यांना मुलाखतीची माहिती आणि त्याचे ठिकाण मोबाईलवर एसएमएस आणि ईमेलद्वारे पाठवले जाईल. उमेदवारांनी मुलाखतीस येताना सर्व कागदपत्रे सोबत आणायची आहेत. महत्वाचे, मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी संस्थेकडून कोणताही TA/DA दिला जाणार नाही. मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहायचे आहे.