Rajarshi Shahu Bank Pune Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. राजश्री शाहू सहकारी बँक लि. पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे असून, उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करू शकतात.
राजश्री शाहू सहकारी बँक लि. पुणे अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, सायबर सिक्युरिटी ऑफिसर” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
![Rajarshi Shahu Bank Pune Bharti 2024](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2024/01/ahmednagarlive24-Rajarshi-Shahu-Bank-Pune-Bharti-2024.jpg)
ही भरती पुण्यात होत असून, उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत. त्यासाठी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचायची आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. येथे ३०ते ५५ वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता पदांनुसार असेल. पदवीधर/द्विपदवीधर तसेच इंजिनियरींगच्या उमेदवारांना येथे काम करण्याची संधी मिळेल. या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास उमेदवारांनी https://www.rajarshishahubankpune.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-पोस्टाने अर्ज 15 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
-येथे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.