पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी, महापालिकेत ‘या’ पदासाठी मेगाभरती, पगार किती मिळेल, अर्ज कसा अन कुठं करायचा? वाचा…

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महापालिकेत विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून मॅकेनिक, सुतार, पेंटर, शीट मेटल वर्क, मशिन टूल दुरुस्ती, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ट्रॅफिक वॉर्डन, उद्यान विभागात माळी, हॉर्टीकल्चर मिस्त्री, क्षेत्रीय कार्यालयाकडील स्वच्छता विषयक कामे, अनुरेखक, आरेखक, लेखनिक, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता अशी विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Tejas B Shelar
Updated:
Pune Jobs

Pune Jobs : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गणेश उत्सवाच्या काळात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना पुण्यात नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच राहणार आहे. कारण की पुणे महापालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी मेगा भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून बारावी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

जर तुमचेही किमान 12वी पास पर्यंतचे शिक्षण झालेले असेल तर तुम्हाला या पदभरती साठी अर्ज करता येणार आहे. पण जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक अन पात्र असाल तर तुम्हाला ताबडतोब अर्ज सादर करावा लागणार आहे. कारण की अर्ज करण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचाच काळ बाकी राहिला आहे.

जर तुम्ही विहित मुदतीत अर्ज केला नाही तर तुमचा अर्ज बाद होईल, तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणून तुम्ही या पदभरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचून आजच तुमचा अर्ज ऑनलाईन सादर करावा. दरम्यान आता आपण या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महापालिकेत विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून मॅकेनिक, सुतार, पेंटर, शीट मेटल वर्क, मशिन टूल दुरुस्ती, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ट्रॅफिक वॉर्डन, उद्यान विभागात माळी, हॉर्टीकल्चर मिस्त्री, क्षेत्रीय कार्यालयाकडील स्वच्छता विषयक कामे, अनुरेखक, आरेखक, लेखनिक, प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता अशी विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती?

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ज्याला मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना म्हणूनही ओळखले जाते या योजनेअंतर्गत पुणे महापालिकेत तब्बल 650 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विविध पदांच्या 650 रिक्त जागा या भरती प्रक्रियेमधून भरणे प्रस्तावित आहे.

अर्ज कुठं करावा लागणार?

www.pmc.org ही पुणे महापालिकेची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत पुणे महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या या पदभरतीसाठी नेमका कुठे अर्ज करायचा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पगार किती मिळणार?

या भरती अंतर्गत निवड होणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारकडून स्टाईपेंड दिले जाणार आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवारांना ६ हजार रुपये, आयटीआय किंवा पदविका धारकांना ८ हजार रुपये, तर पदवीधर अथवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना १० हजार रुपये महिना असे विद्यावेतन दिले जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

महापालिका उपायुक्त नितीन उदास यांनी या योजने अंतर्गत अधिकाधिक उमेदवारांनी, विद्यार्थ्यांनी अर्ज करावा आणि सरकारच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. त्यांनी या योजनेसाठी अर्ज करणे हेतू फक्त सहा दिवसांचा काळ बाकी राहिला असल्याची माहिती यावेळी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe