Pune Mahanagarpalika Bharati 2024 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत अर्थातच पुण्यात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक गुड न्यूज आहे. पुणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यामुळे जर तुम्हीही पुण्यात नोकरी शोधत असाल तर ही संधी मुळीच दवडू नका. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठीची नोटिफिकेशन अर्थातच अधिसूचना देखील जारी झाली आहे. यानुसार या पदभरती अंतर्गत पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. म्हणजेच उमेदवारांना या पदासाठी कोणतीही लेखी अथवा तत्सम कोणतीच परीक्षा द्यावी लागणार नाही. दरम्यान आज आपण या पदभरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार या पदभरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, ट्यूटर/डेमाँनस्ट्रेटर, कनिष्ठ निवासी या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती?
प्राध्यापक : 4 जागा
सहयोगी प्राध्यापक : 10 जागा
सहाय्यक प्राध्यापक : 14 जागा
वरिष्ठ निवासी : 13 जागा
ज्युनिअर रेसिडंट : 4 जागा
ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर : 1 जागा
शैक्षणिक अहर्ता आणि वयोमर्यादा
या विविध पदांसाठी उमेदवारांची पीएचडी, इतर शिक्षण, अनुभव, शिक्षणासंबंधी अनुभव, डिर्जटेशन प्रकाशन इनडेक्स, पुस्तके आणि संदर्भ पुस्तके, मुलाखत या निकषाद्वारे निवड केली जाणार आहे. वयोमर्यादेबाबत बोलायचं झालं तर प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय 50 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय 55 वर्ष अपेक्षित आहे.
सहयोगी प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय खुला प्रवर्गासाठी 45 वर्ष तर राखीव प्रवर्गसाठी 50 वर्षे इतके असणे अपेक्षित आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 40 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवाराचे वय 45 वर्षे इतके असणे आवश्यक आहे.
वरिष्ठ निवासी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 45 वर्ष इतके असणे आवश्यक आहे. ज्युनिअर रेसिडंट आणि ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटर या पदासाठी अर्ज करणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय 43 वर्ष आणि खुल्या गटातील उमेदवाराची वेळ होतीस वर्षे असणे आवश्यक आहे.
उमेदवाराची निवड कशी होणार?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. विशेष म्हणजे सर्वच पदांची निवड मुलाखतीतून होणार आहे. वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी तसेच ट्यूटर या पदासाठी 09 ऑगस्ट 2024, 23 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट 2024 सकाळी 11 वाजता तसेच प्रोफेसर,असोसिएट प्रोफेसर,असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी याच दिवशी दुपारी 3.00 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखत कुठे होणार?
नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या माहितीनुसार, अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मंगळवार पेठ, पुणे या ठिकाणी मुलाखत होणार आहे.
किती पगार मिळणार?
प्राध्यापक पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवाराला एक लाख 85 हजार पगार मिळणार आहे.
सहयोगी प्राध्यापक पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवाराला एक लाख 70 हजार पगार मिळणार आहे.
सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवाराला एक लाख पगार मिळणार आहे.
वरिष्ठ निवासी या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवाराला 80 हजार 250 रुपये पगार मिळणार आहे.
ट्यूटर/डेमॉन्स्ट्रेटरची आणि ज्युनिअर रेसिडंट या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवाराला 64 हजार 551 रुपये एवढा पगार मिळणार आहे.