Pune Mahanagarpalika Bharti : पुणे महानगरपालिकेत सध्या विविध जगा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एक चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
पुणे महानगरपालिका अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” पदांच्या एकूण 113 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 असून, उमेदवारांनी देय तरखे अगोदर आपले अर्ज सदर सादर करायचे आहेत।
या भरतीसाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक. तसेच खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०००/- रूपये तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ९००/- रूपये इतके शुल्क आहेत. तसेच अर्ज करण्याची वयोमर्यादा 18 ते 55 वर्षे इतकी आहे.
अर्ज ऑनलाईन https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/ या लिंक द्वारे सादर करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 असून, देय तारखे अगोदर अर्ज सादर करायचे आहेत, या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.pmc.gov.in/ ला भेट द्या.
आशा पद्धतीने करा अर्ज
-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज ऑनलाईन https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/ या लिंकवर सादर करायचे आहेत.
-अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.