Pune Railway Police Bharti : पुणे रेल्वे पोलीस शिपाई भरती जाहीर, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

Pune Railway Police Bharti 2024

Pune Railway Police Bharti 2024 : पुणे रेल्वे पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई व चालक पदांच्या जागेसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

पोलीस शिपाई व चालक पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने 5 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे.

तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो.

तसेच पोलीस भरती 2024 साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंकवर दिलेली आहे. तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंकवर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड)  संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी 12 वी पास उमेदवार अर्ज सादर करू शकतात.

वयोमर्यादा

या भरतीसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 28 वर्षे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 18 ते 33 वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी 450 /- रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 350 /- रुपये असे आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2024.mahait.org/ या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

अर्जाची तारीख

अर्ज सुरु होण्याची तारीख ५ मार्च २०२४ असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास punerailwaypolice.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने https://policerecruitment2024.mahait.org पोर्टल द्वारे सादर करायचा आहे.

-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा, अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. तसेच अर्ज 31 मार्च 2024 पर्यंत सादर करावेत.

-भरती जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

PDF जाहिरात (शिपाई)

PDF जाहिरात (चालक)

निवड प्रक्रिया

शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी, वैद्यकीय चाचणी इ.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe