Pune University Bharti 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे. तसेच, अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
ही भरती एकूण 111 जागा भरण्यासाठी होत आहे.
शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक : PhD degree
सहयोगी प्राध्यापक : PhD degree
सहायक प्राध्यापक : PhD degree
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे सुरु आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याचा पत्ता
ऑफलाईन अर्ज सहाय्यक कुलसचिव, प्रशासन-अध्यापन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे 411007 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
ऑनलाईन अर्ज 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख
ऑफलाईन अर्ज 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी http://www.unipune.ac.in/ या वेबसाईटवर क्लिक करा.
असा करा अर्ज
-या पदासाठी उअर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.unipune.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
-ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
-ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.
-ऑफलाईन अर्ज सादर करायची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे.
-ऑफलाईन अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.