Career Tips: हवामान शास्त्रज्ञ व्हा आणि भरघोस पगाराची नोकरी मिळवा! काय लागते शैक्षणिक पात्रता? किती मिळतो पगार? जाणून घ्या माहिती

career tips

Career Tips:- साधारणपणे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर करिअरच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पालक त्यांच्या पाल्यांच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक निर्णय घेत असतात. कारण करिअरच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यासाठी हा कालावधी खूप संवेदनशील असतो.

कारण यावेळी जर निर्णय चुकला तर आयुष्यातील करिअरची पूर्ण वाट लागण्याची शक्यता असते. आजकाल अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात व प्रत्येक अभ्यासक्रमानुसार वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करियर करण्याच्या संधी निर्माण होत असतात. अगदी आज मुद्द्याला समोर ठेवून जर आपण हवामान शास्त्र ही शाखा पाहिली तर ही अर्थ सायन्स विषयाची उपशाखा आहे.

यामध्ये हवामानाचे विश्लेषण कसे केले जाते याबद्दल शिकवले जाते. या माध्यमातून हवामानाचा अंदाज घेण्याकरिता हवामान शास्त्रज्ञ हवामान आणि वातावरणाशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्यावर संशोधन करत असतात.

हवामान शास्त्रज्ञ यांची मागणी दिवसेंदिवस वाढत जाणारी असून हवामान विभागाच नाही तर अनेक वृत्त संस्था तसेच खाजगी संस्था देखील सध्या हवामान शास्त्रज्ञांची नियुक्ती करत असल्याचे आपल्याला दिसून येते. ज्या विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आवड आहे

अशा विद्यार्थ्यांकरिता करिअरच्या दृष्टिकोनातून हा एक उत्तम असा पर्याय आहे. हवामान शास्त्रज्ञांना अंतराळ संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसेच हवामान अंदाज विभाग व त्यासोबत खनिकर्म विभाग इत्यादी ठिकाणी देखील खूप मागणी आहे.

 हवामान शास्त्रज्ञामध्ये कुठली कौशल्य असावीत?

हवामान शास्त्रज्ञांना वातावरणाशी संबंधित ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्यांचे तपशीलवार विश्लेषण करावे लागते व दीर्घ कालावधीपर्यंत यावर काम करणे गरजेचे असते. यामागील महत्वाचे कारण म्हणजे हवामान विभाग हा 24 तास कार्यरत असतो.

त्यामुळे यासंबंधीची सगळी कामे खूप आव्हानात्मक असे असतात. एवढेच नाही तर हवामान शास्त्रज्ञांना इतर विविध विभागांचे जे काही तज्ञ आहेत त्यांच्याशी कॉपरेट अर्थात समन्वय साधणे खूप गरजेचे असते. तसेच टीमवर्क करणे महत्त्वाचे असते. एका हवामान शास्त्रज्ञमध्ये संगणकाचा वापर तसेच अचूकता, संयम व अचूक निरीक्षण शक्ती आणि संवाद कौशल्य यांचा मेळ असणे गरजेचे असते.

 हवामान शास्त्रज्ञांना किती मिळतो पगार?

1-शेती, हवामान या क्षेत्रात जे  हवामान तज्ञ काम करतात त्यांना दरमाह 25 ते 30 हजार रुपये सुरुवातीचा पगार मिळू शकतो व अनुभव जसा वाढत जाईल तसतसा पगार हा 60000 ते दीड लाख रुपये पर्यंत वाढतो.

2- याशिवाय हवामान शास्त्रज्ञांना अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. या ठिकाणी तुलनेने पगार हा जास्त असतो.

3- तसेच कृषी नियोजन विभाग, हवामान संशोधन केंद्र, हवाई दल आणि हवामान सल्लागार संस्था  इत्यादी ठिकाणी देखील हवामान तज्ञांना खूप मोठी मागणी असते.

 कोणत्या ठिकाणी आहेत करिअरच्या संधी?

1- डीआरडीओ तसेच इस्रो, नाबार्ड यासारख्या सरकारी संस्थांमध्ये देखील हवामान शास्त्रज्ञांना मोठी मागणी असते.

2- तसेच टाटा व महिंद्रा, रिलायन्स सारखे उद्योगसमूहांमध्ये देखील हवामान तज्ञांना मागणी आहे.

3- तसेच सध्या अनेक खाजगी क्षेत्रातील कंपन्या नैसर्गिक संसाधनांशी संबंधित असलेल्या उद्योगांमध्ये प्रवेश करत असल्याने देखील आता खाजगी क्षेत्राकडून हवामान तज्ञांची मागणी वाढू शकणार आहे.

 हवामान शास्त्रज्ञ होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता?

1- हवामान शास्त्राला वातावरणीय विज्ञान असे देखील म्हटले जाते.

2- हवामान शास्त्रात ज्यांना करिअर करायचे आहे त्यांनी वातावरण शास्त्रात पदवी घेणे आवश्यक आहे.

3- या विषयातील ज्या विद्यार्थ्यांनी बी टेक  किंवा बीएससी केलेली आहे अशा पदवीधरांना या क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी निर्माण होते.

4- तसेच पदवीधारकांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची निवड करून हवामान शास्त्रात करिअर करता येणे शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe