Trakstar 540 Tractor: 2235 सीसी मधील 40 एचपीचा ‘हा’ पावरफुल ट्रॅक्टर शेतीतील अवघड कामे करेल सोपे! मिळतो परवडणाऱ्या किमतीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Trakstar 540 Tractor:- भारतामध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर निर्मिती केली जाते व काही विदेशी कंपन्यांचे ट्रॅक्टर देखील भारतीय बाजारपेठेमध्ये असून शेतकरी त्यांच्या गरजेनुसार आणि आर्थिक बजेट पाहून ट्रॅक्टरची खरेदी करतात.

भारतामध्ये प्रामुख्याने महिंद्रा अँड महिंद्रा तसेच सोनालिका, कुबोटा, जॉन डियर इत्यादी कंपनीचे ट्रॅक्टर मॉडेल मोठ्या प्रमाणावर शेतकरी वापरतात. परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला शेतीच्या कामांसाठी पावरफुल ट्रॅक्टर घ्यायचा असेल

तर तुम्ही Trakstar 540 हे ट्रॅक्टर देखील घेऊ शकतात व सध्या एक भारतीय शेतकऱ्यांमधील खूप लोकप्रिय असे ट्रॅक्टर आहे. शेतीसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हे पावरफुल ट्रॅक्टर बनविण्यात आलेले असून शेतीकामांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

 या ट्रॅक्टरचे इंजिन आणि इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये

Trakstar 540 ट्रॅक्टरमध्ये 2235cc क्षमतेच्या तीन सिलेंडरमध्ये कुलंट इंजिन देण्यात आलेले असून ते 40 एचपी पावर जनरेटर करते. तसेच कंपनीने हे ट्रॅक्टर ड्राय टाइप एयर फिल्टरसह सादर केले असून या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर ३४.१७ एचपी असून त्याचे इंजिन 2200 आरपीएम जनरेट करते.

हा ट्रॅक्टर पन्नास लिटर क्षमतेच्या इंधन टाकीसह येतो व या ट्रॅक्टरची हायड्रोलिक पावर म्हणजेच वजन उचलण्याची क्षमता आहे ही 1500 किलोग्राम इतकी आहे. हे ट्रॅक्टर 1835 kg वजनाचे असून या ट्रॅक्टरचा व्हिलबेस हा 1880 एमएम इतका आहे.

याशिवाय ट्रॅक्टरमध्ये मेकॅनिकल/ पावर स्टेरिंग देण्यात आलेले असून या मदतीने स्मूथ ड्राईव्ह करण्याला मदत मिळते. तसेच या ट्रॅक्टरमध्ये आठ फॉरवर्ड व दोन रिव्हर्स गियरसह गिअरबॉक्स देण्यात आला असून या ट्रॅक्टरचा क्लच डायफ्रेम प्रकारचा आहे

व तो कॉन्स्टंट मेश ट्रान्समिशनसह येतो. तसेच या ट्रॅक्टरमध्ये ऑइल ईमरस्ड डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत व या मदतीने टायरवर मजबूत पकड ठेवता येणे शक्य होते. हा ट्रॅक्टर दोन व्हिल ड्राईव्हसह येतो.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

Trakstar 540 ट्रॅक्टरची भारतातील एक्स शोरूम किंमत पाच लाख 71 हजार ते सहा लाख 44 हजार रुपये दरम्यान ठेवण्यात आलेली असून आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते. याशिवाय कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरसह सहा वर्षांची वारंटी देण्यात आली आहे.