अभिनेता साहिल खानला अटक, चाळीस तास पाठलाग ! 1 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी, काय आहे प्रकरण? पहा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिने इंडस्ट्रीमधून एक मोठे वृत्त आले आहे. नावाजलेला अभिनेता साहिल खान याला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टाने 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी याअभिनेत्यास पकडण्यात आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एसआयटीच्या पथकाने त्याला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. आता त्याला 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडीतच राहावे लागणार आहे. महादेव बेटींग ॲपचा प्रसार केल्याप्रकरणी साहिल खान अटकेत असून पोलीस कोठडीत असणार आहे.

अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर छत्तीसगडमधून मुंबईत आणले होते. साहिल खानला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

छत्तीसगड येथील साहिल खान याला शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते, त्यानंतर त्याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाकडून त्यांचा जमिनीचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी आता मुंबई पोलीस साहिल खानची चौकशी करणार आहेत.

दरम्यान महादेव बेटिंग ॲप प्रकरण हे देशभरात गाजले आहे. या प्रकरणी या आधीही अनेकांची चौकशी झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गज कलाकारही सामील असल्याची चर्चा आहे. हा एक मोठा गैरव्यवहार असून करोडोंची मनिलॉन्डरिंग सारखे प्रकार याद्वारे घडले असल्याची माहिती मिळाली आहे.

40 तास पाठलाग….
एका मीडियाने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने साहिल खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्याने मुंबईतून पळ काढला. पोलीस जवळपास 40 तास त्याचा पाठलाग करत होते.

तो सतत त्याचे लोकेशन बदलत होता परंतु असे असले तरी अखेर पोलिसांनी साहिलला बेड्या ठोकल्या. या आधी गुरुवारी (25 एप्रिल) महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने स्थापन केलेल्या एसआयटी पथकाने साहिल खानची चार तासांहून अधिक वेळ चौकशी केली असल्याची माहिती मिळाली आहे.