Job Information:- ED म्हणजेच इन्फॉर्समेंट डीक्टोरेट यालाच मराठीमध्ये अंमलबजावणी संचालनालय असे देखील म्हणतात. ईडी हे नाव गेल्या काही वर्षापासून सातत्याने आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात येत असेल. अनेक उद्योगपती तसेच बऱ्याच राजकीय व्यक्तीच्या घरांवर ईडीने छापा टाकल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत.
या अगोदर आपल्याला अशाप्रसंगी छापा टाकल्याच्या बद्दल सीबीआय हे नाव बहुतांशी माहिती होते. परंतु आता त्या ऐवजी ED हे नाव अशा कारवायांसाठी जास्त करून आपल्याला ऐकायला येत आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की नेमके हे डिपार्टमेंट कोणते आहे किंवा यामध्ये जर नोकरी मिळवायची तर ती कशी मिळते? चला तर मग याच प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात बघू.
ED मध्ये कशी केली जाते भरती?
साधारणपणे ईडी बहुतेक पदांवर प्रति नियुक्ती करून भरती करत असते. परंतु बऱ्याचदा ईडीच्या माध्यमातून अनेक वेळा पदांची भरती देखील केली जाते व तसेच जाहिराती देखील प्रसिद्ध होत असतात.
दरवर्षी कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून एसएससी सीजीएल परीक्षा घेण्यात येते व त्याकरिता केंद्रीय विभागांमध्ये भरती केली जाते. एसएससी सीजीएल परीक्षेच्या माध्यमातून सहाय्यक ईडी अधिकाऱ्यांच्या पदांची भरती केली जाते.
ED मध्ये नोकरी करिता काय पात्रता लागते?
जर तुम्हाला ईडीमध्ये नोकरी करायचे असेल किंवा अधिकारी व्हायचे असेल तर तुमच्याकडे व शिक्षण पात्रता असणे गरजेचे आहे व याकरिता तुम्ही कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे गरजेचे आहे. तसेच काही प्रमाणपत्र व स्पर्धा परीक्षांमधला सहभाग हा महत्त्वाचा ठरतो.
ED मध्ये नोकरीकरिता किती वयोमर्यादा लागते?
ईडीमध्ये नोकरी करायची असेल तर इच्छुक असलेल्या उमेदवाराचे वय किमान 21 ते कमाल 30 वर्ष असणे गरजेचे आहे. तसेच यामधील प्रतिष्ठित पदासाठी स्पर्धा करण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्पर्धात्मक लेखी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच काही प्रसंगी किंवा काही प्रकरणांमध्ये मेडिकल आणि फिटनेस टेस्ट देखील घेतल्या जातात व यामध्ये तुम्ही उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
यामध्ये जर असिस्टंट ईडी ऑफीसर पदावर नोकरी मिळवायची असेल तर त्याकरिता उमेदवारांना एसएससी सीजीएलसाठी अर्ज करणे गरजेचे असते व उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईट द्वारे याकरिता अर्ज करावा लागतो.
असिस्टंट ईडी ऑफिसर पदासाठी अर्ज करायचा असेल तर पदवीधर असणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे जे उमेदवार राखीव प्रवर्गातील असतात त्यांच्या कमाल वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात येते.
ED मध्ये उमेदवारांची निवड करण्याची पद्धत
असिस्टंट ईडी अधिकारी या पदाकरिता निवड टीयर एक आणि टीयर दोन या परीक्षेच्या माध्यमातून केली जाते. यामध्ये टीयर एक परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार टियर दोन परीक्षेसाठी पात्र ठरतात.
त्यानंतर टीयर दोन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली जाते आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाते. या पदासाठी साधारणपणे निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 44 हजार 900 रुपये ते दीड लाखांच्या दरम्यान वेतन मिळते.