Yellow Urine Causes : सावधान ! तुम्हालाही उन्हाळ्यात पिवळ्या रंगाची लघवी होते का?, आजच घ्या डॉक्टरांचा सल्ला…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Yellow Urine Causes : उन्हाळ्यात अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या वाढू लागतात, त्यातील सर्वात सामान्य समस्या म्हणजे डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता जाणवणे. हे बऱ्याचवेळा जास्त घाम आणि लघवीद्वारे शरीरातून पाणी पडणे यामुळे होते.

अनेकवेळा शरीरात पाण्याची कमतरता जाणवल्याने लघवीच्या रंगावर देखील परिणाम होतो. उन्हाळ्यात या प्रकारची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. खरं तर हे शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे होते. तसेच लघवीला वास येणे आणि काही वेळा लघवीमध्ये जळजळ देखील जाणवते. अनेकवेळा आपण या समस्येकडे दुर्लक्ष करतो, पण या समस्येकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते.

लघवीचा रंग डिहायड्रेशनमुळे पिवळा होऊ शकतो. पण जर एखादी व्यक्ती भरपूर पाणी पीत असेल आणि तरीही लघवीचा रंग बराच काळ पिवळा राहत असेल तर हे कावीळचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि तपासणी करणे आवश्यक आहे. काही वेळा लोकांच्या लघवीचा रंग लालही होऊ लागतो. सामान्यतः लघवीचा रंग लाल होतो जेव्हा त्यात रक्त दिसू लागते. ही स्थिती किडनी स्टोन, युरेटर स्टोन आणि ब्लॅडर कॅन्सरमुळे उद्भवू शकते. अशा परिस्थितीत, आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

डॉक्टरांच्या मते, उन्हाळ्यात प्रत्येकाने दररोज 2-3 लिटर पाणी प्यावे. जेव्हा आपल्या शरीराला पाण्याची गरज भासते तेव्हा आपल्याला तहान लागते आणि त्या वेळी आपण पाणी प्यावे. उन्हाळ्यात किडनी स्टोनच्या रुग्णांना जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. या ऋतूत लोकांनी आपल्या आहारात द्रवपदार्थांचा जास्त समावेश केला पाहिजे.

शरीरातील पाण्याची कमतरता कशी पूर्ण करावी?

-उन्हाळ्यात जास्त पाणी पिले पाहिजे. जास्त पाणी पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढता येते.

-उन्हाळ्यात अशा पदार्थांचा आहारात समावेश करा ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघेल.

-शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी फळे, भाजीपाला, दही, दुधाचे पदार्थ आणि साधे पाणी सेवन करा.

-दिवसभरात दोन ते दोन लिटर पाणी पाणी गरजेचे.