Ahmednagar Breaking : शेवगाव, नेवासे नंतर आता ‘या’ तालुक्यात शेअर मार्केटच्या आमिषाने फसवणूक ! लंडनच्या ‘लीना’ने लाखो लुबाडले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात शेअर मार्केटच्या आमिषाने, त्यातील गुंतवणुकीच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. शेवगाव, नेवासे या तालुक्यांत असले प्रकार प्रकर्षाने उजेडात आले.

आता आणखी एक असाच फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तर लंडनमधील लीना ने लाखो लुबाडले आहेत. हे प्रकरण राहाता तालुक्यातील वाकडी येथे घडले आहे.

वाकडी येथील एकास शेअर्स मार्केटमध्ये आमच्यामार्फत पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगत ४ लाख ९० हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. सदर व्यक्ती मुंबई येथील ‘आयक्युव्हीआ’ येथे असोसिएट म्हणून काम करतात.

त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली. त्यावर क्लिक केले असता, ब्रँड सिक्युरिटी नावाच्या व्हॉटस्‌ अँप ग्रुपला ते अँड झाले. हा ग्रुप अँडमिन शरीफ सिंग (रा. लंडन) यांची असिस्टंट लीना ग्रिफीत हिने या ग्रुपवर शरीफ सिंग यांना शेअर मार्केट ट्रेडिंगचा अनुभव असून, तुम्ही आमच्यामार्फत पैसे गुंतवल्यास चांगला परतावा असे सांगितले.

लीना ग्रिफीत हिने टेलिंग्रामवरून वेगवेगळ्या बँक खात्याचे डिटेल्स देऊन तुम्ही त्यात पैसे गुंतवा, असे सांगितले. त्यामुळे लहारे यांनी सुरूवातीला १५ हजारांची गुंतवणूक केली. त्यात त्यांना १० टक्के परतावा मिळाला.

त्यामुळे १२ मार्चला त्यांनी त्याच बँकेत २० हजार, नंतर १४ मार्चला ३० हजार, २१ मार्चला १ लाख १० हजार व २२ एप्रिलला १ लाख रुपये गुंतवले. ३ एप्रिलला २ लाख १५ हजार रुपये एक्सिस बँक, कानपूर यामध्ये गुंतवले, असे एकूण ४ लाख ९० हजार रुपये त्यांनी गुंतवले.

६ एप्रिलला त्यांनी त्यांना आलेल्या लिंकवर क्लिक केले असता, लिंकमध्ये त्यांनी डिटेल्स टाकून पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न केला, परंतु पैसे वर्ग झाले नाही. त्यांनी लीना ग्रिफीत हिला टेलिग्राम चॅटमध्ये याबाबत विचारणा केली असता,

तिने अजून पैसे भरण्यास सांगितले. मात्र, नंतर त्यांनी पैसे भरले नाही. सदर व्यक्तीची यांची ४ लाख ९० हजारांची फसवणूक झाली असून, श्रीरामपूर तालुका पोलिसांनी शरीफसिंग (रा. लंडन), लीना ग्रिफीत यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.