AIIMS Nursing : AIIMS अंतर्गत नर्सिंग पदांच्या जागेसाठी भरती सुरु, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

AIIMS Nursing Officer Bharti

AIIMS Nursing Officer Bharti : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती अंतर्गत “नर्सिंग अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2024 आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने नर्सिंग ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशातील विविध एम्समध्ये नर्सिंग ऑफिसरची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील मुंबई एम्सचा देखील या भरती प्रक्रियेत समावेश आहे. एम्स दिल्लीने यासंदर्भातील नोटिफिकेशन देखील जारी केले आहे.

वरील पदासाठी उमेदवाराचे B.Sc. (Hons.) Nursing झालेले असावे. तसेच यासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे इतकी आहे, यापुढील उमेदवारांना संधी मिळणार नाही. तसेच येथे अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क देखील आहेत. सामान्य/ओबीसी उमेदवारासाठी हे शुल्क 3000/- रुपये तर SC/ST/EW उमेदवारासाठी 2400/- रुपये इतके आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा आणि आपले सादर करा. अर्ज 17 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट www.aiimsexams.ac.in ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-अर्ज सादर करताना अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.अन्यथा अर्ज अपूर्ण सजून नाकारण्यात येईल.

-अर्जासह आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करा. भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe