ESIC Pune Bharti 2024 : ESIC पुणे मध्ये विविध पदांकरिता भरती सुरु; ‘या’ तारखेला होणार मुलाखत !

ESIC Pune Bharti 2024

ESIC Pune Bharti 2024 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर मुलाखतीकरिता खाली दिलेल्या तारखे पर्यंत हजर राहायचे आहे.

वरील भरतीसाठी “पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ, ज्येष्ठ निवासी, अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता 01 आणि 02 मार्च 2024 रोजी हजर राहायचे आहे.

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल…

पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ : MBBS with P.G Degree or equivalent from recognized university

ज्येष्ठ निवासी : MBBS with PG Degree or Equivalent / PG Diploma in concerned specialty from recognized university

अर्धवेळ आयुर्वेदिक चिकित्सक : Degree in Ayurveda from a recognized university/ Statutory Board/ Counsil/ Faculty of Indian Medicine

या भरतीसाठी मुलाखत ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नं. 690, बिबवेवाडी, पुणे-37 या पत्त्यावर घेण्यात येणार आहे, उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी अर्जासह हजर राहायचे आहे. मुलाखत 01 आणि 02 मार्च 2024 रोजी घेण्यात येणार आहे. भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट https://www.esic.gov.in/ ला भेट द्या.

आवश्यक कागदपत्रे

वयाच्या पुराव्यासाठी मॅट्रिकचे प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, MMC/MCI नोंदणी प्रमाणपत्रे, नोंदणीचे नूतनीकरण, जातीचे प्रमाणपत्र/नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्रे, आधीच सरकारमध्ये काम करत असल्यास NOC. संस्था/संस्था, दोन छायाचित्रे (PP आकार).

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. तरी उमेदवारांनी मुलाखती करिता संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.

-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता आवश्यक कागदपत्रांसह 01 आणि 02 मार्च 2024 रोजी हजर आहे. मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe