Bank of Maharashtra Bharti : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज…

Bank of Maharashtra Bharti : जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या बँक ऑफ महाराष्ट्र मुंबई अंतर्गत विविध जगासाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

वरील भरती अंतर्गत “डायरेक्ट सेलिंग एजंट्स (D.S.A.) (रिटेल लोनकरिता), गोल्ड अप्रेसर, एज्युकेशन लोन कौन्सिलर” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

यासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय, सिडको जुनी प्रशासकीय इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी मुंबई या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल https://bankofmaharashtra.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत,

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावीत.

-अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे. त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.