कारागृह विभागात पोलीस शिपाई पदांच्या जागेसाठी सुरु आहे भरती; 12वी पास उमेदवारांनी करा अर्ज!

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra Prisons Department : कारागृह पोलीस विभागा अंतर्गत सध्या विविध पदांकरिता भरती निघाली आहे, यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात येते आहेत, जर तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा.

कारागृह पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 513 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, उमेदवार येथे ३१ मार्च २०२४ पर्यंत अर्ज सादर करू शकतात. लक्षात घ्या उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता

12 वी पास उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र आहेत, तरी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करावेत.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा सामान्य उमेदवारांसाठी 18 ते 28 वर्षे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 33 वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

यासाठी अर्ज शुल्क देखील अनिवार्य आहे खुल्या प्रवर्गासाठी 450 /- रुपये तर मागास प्रवर्गासाठी 350 /- रुपये इतके शुल्क आहे.

महत्वाच्या तारखा

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ५ मार्च २०२४ पासून सुरु झाली असून, उमेदवार ३१ मार्च २०२४ पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास Karagruh Vibhga Shipaipolice.gov.in ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे, अर्ज https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.

-उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज पूर्ण भरलेला असावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी. तसेच अर्ज देय तारखेपर्यंत सादर करावेत.

-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सवसितर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe