SID Mumbai Bharti 2024 : सुवर्णसंधी ! आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई अंतर्गत सुरु आहे भरती, आजच करा अर्ज !

SID Mumbai Bharti 2024

Mumbai Bharti 2024 : आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे, तरी उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत.

या भरती अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 असून, लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत.

सेवानिवृत्त अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता देखील गरजेची असेल, तरी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर पात्रता बघून आपले अर्ज सादर करावेत.

अर्ज dca.sid-mum@mahapolice.gov.in या ई-मेलवर अर्जासह पाठवायचे आहेत, लक्षात घ्या नोकरीचे ठिकाण मुंबई असून, येथील उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असेल. तुम्हाला या भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास अधिकृत वेबसाईट www.mahapolice.gov.in ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचे आहेत, लक्षात घ्या अर्जासह आवश्यक कागदपत्रे देखील जोडायची आहेत.

-अर्ज हा पूर्ण असावा, अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच अर्ज 28 फेब्रुवारी 2024 पर्यंतच सादर करायचे आहेत विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe