NUHM PCMC : NUHM पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही सध्या एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जात आहेत, तसेच त्यासाठी लागणारे शिक्षण जाणून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यंत वाचा.
वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) पुरुष” पदांच्या एकूण 201 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असले, यासाठी १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच एम.बी.बी.एस. पदवी किंवा बी.ए.एम.एस. उत्तीर्ण आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण
ही भरती पिंपरी चिंचवड येथे होत आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
यासाठी अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक-जावक कक्ष या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज कार्यालयीन वेळेत १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून, 21 जून 2024 पर्यंत आपले अर्ज सादर करावे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.