Van Vibhag Nashik Bharti : नाशिक वन विभागात निघाली भरती; जाहिरात प्रकाशित

Published on -

Van Vibhag Nashik Bharti : वन विभाग नाशिक अंतर्गत सध्या रिक्त जागेसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. यासाठी पात्रता काय असेल जाणून घ्या.

वरील भरती अंतर्गत “कायदेशीर सल्लागार” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

पात्रता

-यासाठी विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

-उमेदवारास मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.

-करार पध्दतीने नियुक्ती करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी शारीरीक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांचेकडे आवश्यक क्षमता असावी.

-करार पध्दतीने नियुक्ती करावयाच्या सेवानिवृत्ती अधिकारी यांचे विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालू किया प्रस्तावित नसावी किवा अश्या चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी. याबाबत उमेदवारानी अर्ज करतेवेळी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 65 वर्ष इतकी आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

निवड प्रक्रिया

यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज दिलेल्या दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महत्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया 21 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट https://mahaforest.gov.in/ ला भेट देऊ शकता.

अशा पद्धतीने करा अर्ज

-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-तसेच अर्जासह आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News