Renukamata Multistate Society : रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी अहमदनगर अंतर्गत निघाली भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज!

Renukamata Multistate Society

Renukamata Multistate Society : श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. यासाठी भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही सध्या अहमदनगर मध्ये स्थित असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे.

वरील भरती अंतर्गत सध्या “शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, क्लार्क” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्जदार पदवीधर आणि पदव्युत्तर असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण

नोकरीचे ठिकाण अहमदनगर येथे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

इच्छुक उमेदवार अर्ज मिरजगाव, मुंजाबा चौक, भुई गल्ली, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अ.नगर-४१४४०१ या पत्त्यावर पोस्टाने पाठवू शकतात. तसेच अर्ज 17 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास http://www.renukamatamultistate.com/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. अर्जासह आवश्यक कागदपत्रे देखील पाठवायची आहेत.

-अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर 17 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe