RRB Group D Exam 2022 : जर तुम्ही रेल्वे ग्रुप डी (Railway Group D) भरती (Recruitment) परीक्षेसाठी अर्ज (application) केला असेल आणि उद्यापासून परीक्षा देणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. पहिल्या टप्प्यात, RRB गट डी भरती परीक्षा 17 ऑगस्ट 2022 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत चालेल.
यानंतर, दुसरा टप्पा 26 ऑगस्ट 2022 ते 8 सप्टेंबर 2022 पर्यंत चालेल. या भरती परीक्षेद्वारे गट डी (RRB स्तर 1 पदे CBT) ची 1.03 लाख पदे भरली जातील. या रिक्त पदासाठी सुमारे 1 कोटी 15 लाख उमेदवारांनी गट ड साठी अर्ज केले आहेत. येथे आम्ही तुम्हाला परीक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती सांगत आहोत.
हा परीक्षेचा नमुना असेल
पेपर 100 गुणांचा असेल, त्यासाठी तुम्हाला 90 मिनिटे मिळतील. पेपरमध्ये 25 प्रश्न जनरल सायन्स, 25 प्रश्न मॅथ्स, 30 प्रश्न जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग (General Intelligence and Reasoning) आणि 20 प्रश्न जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्समधून विचारले जातील.
परीक्षेशी संबंधित नियम (rule)
तुम्ही परीक्षा देणार असाल तर घराबाहेर पडण्यापूर्वी परीक्षेशी संबंधित हे नियम नक्की वाचा. यामुळे तुम्ही अडचणीत येणार नाही.
उमेदवारांना त्यांचे मूळ आधार कार्ड परीक्षा केंद्रावर सोबत घेऊन जावे लागेल. आधार आणण्याचे कारण म्हणजे परीक्षा केंद्रावर केले जाणारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण.
प्रत्येक उमेदवाराला मास्क घालून केंद्रावर जावे लागेल. केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
ग्रुप डी सीबीटीमध्ये निगेटिव्ह मार्किंगची प्रणाली आहे. अशा परिस्थितीत, चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केला जाईल.
तुमच्या प्रवेशपत्रासोबत मूळ फोटो ओळखपत्र सोबत ठेवा. फोटो कॉपी स्वीकारली जाणार नाही.
परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन, पेजर, घड्याळ, ब्लूटूथ उपकरण, कॅल्क्युलेटर, बांगडी, बेल्ट, ब्रेसलेट आदींसह प्रवेश मिळणार नाही.
डाव्या हाताच्या अंगठ्यावर मेंदी किंवा कोणताही रंग लावू नका. यामुळे बायोमेट्रिक्समध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.
CBT मध्ये प्रश्न पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला SAVE आणि नंतर NEXT वर क्लिक करावे लागेल. जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचे उत्तर सेव्ह केले नाही तर ते तपासले जाणार नाही.