ST Mahamandal Bharati 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना एसटी महामंडळात काम करायचे असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की एसटी महामंडळात नुकतीच एक मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे.
या अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामुळे इच्छुकांचे नोकरीचे स्वप्न साकार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लाडका भाऊ योजना अर्थातच मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एसटी महामंडळात ही भरती जाहीर करण्यात आली आहे.
यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. एस टी महामंडळाच्या यवतमाळ विभागात ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत आज आपण यवतमाळ विभागात निघालेल्या या पदभरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती
यवतमाळ एसटी महामंडळात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लिपिक, सहाय्यक शिपाई आणि इलेक्ट्रिशियन या पदासाठी ही भरती होणार आहे. या तिन्ही रिक्त पदांच्या जवळपास 68 जागा या पदभरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी पास किंवा आयटीआय किंवा डिप्लोमा धारक असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार 18 ते 35 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. म्हणजेच 18 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा अधिकचे वय असणारा उमेदवार यासाठी अपात्र ठरणार आहे.
किती पगार मिळणार ?
या भरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार 6000 रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाणार आहे. ही भरती एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागात होत असेल तरीदेखील या अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना राज्य शासनाच्या माध्यमातून पगार दिला जाणार आहे. या अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना सहा महिने काम दिले जाणार आहे.
अर्ज कसा अन कुठं करावा लागणार?
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही भरती मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत होणार असल्याने https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.