तरुणांसाठी आनंदाची बातमी ! वनरक्षक भरतीचा मार्ग झाला मोकळा, ‘त्या’ रिक्त जागा सोडून ‘इतक्या’ जागांसाठी भरतीचा निर्णय

Published on -

Forest Department Recruitment 2024 : नुकतीच तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे तलाठी परीक्षेला बसलेल्या साडेआठ लाखाहून अधिक अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर तलाठी भरतीची गुणवत्ता यादी केव्हा जाहीर होणार हाच सवाल गेल्या काही दिवसांपासून तलाठी भरती दिलेल्या उमेदवारांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.

आम्हा पत्रकारांना देखील याबाबतचा प्रश्न संबंधित उमेदवारांकडून सातत्याने विचारला जात होतो. दरम्यान तलाठी भरतीची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून याची अंतिम निवड यादी देखील उद्यापासून अर्थातच सोमवारपासून जाहीर होणार आहे. विशेष बाब अशी की येत्या तीन आठवड्यात अंतिम निवड यादी जाहीर होईल अशी माहिती तलाठी भरती समन्वयक सरिता जी नरके यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, सरिता जी यांनी सांगितल्याप्रमाणे, पेसा क्षेत्रातील अर्थातच आदिवासी बहुलक्षेत्रातील रिक्त जागांसंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलेले आहे. यामुळे या आदिवासीबहुल 13 जिल्ह्यांमधील अंतिम निवड यादी जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होईल तेव्हाच प्रसिद्ध केली जाणार आहे. उर्वरित 23 जिल्ह्यांमधील तलाठी भरतीची अंतिम निवड यादी मात्र येत्या सोमवारपासून जाहीर होणार आहे.

विशेष म्हणजे याच फॉर्मुल्यानुसार आता वनरक्षक भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य शासनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जी यांनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्री महोदय यांनी पेसा अर्थातच आदिवासी बहुल क्षेत्रातील ( अनुसूचित क्षेत्रातील ) रिक्त जागा सोडून 1 हजार 256 जागांसाठी वनरक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या वनरक्षक भरतीची वाट पाहिली जात होती त्या वनरक्षक भरतीचा आता मार्ग मोकळा झालाआहे. खरेतर वन विभागाकडून 2,138 वनरक्षक पदाच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात आली होती. यासाठी ऑगस्टच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्यात आली होती. टिसीएस-आयओएन कंपनीद्वारे वनरक्षकांची परीक्षा देखील घेण्यात आली होती.

मात्र आदिवासीबहुल अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. यामुळे तलाठी, वनरक्षक सह सर्वच भरती प्रक्रियेला याचा फटका बसला. हेच कारण आहे की, आता शासनाने पेसा क्षेत्रातील जागा सोडून इतर 1256 जागांसाठीच्या वनरक्षकांच्या भरतीचा निर्णय घेतलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News