Pimpri Chinchwad Municipal Corporation : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “ब्रिडींग चेकर्स” पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची तारीख 03 जुलै 2024 असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
नोकरी ठिकाण
भरती पिंपरी चिंचवड येथे सुरु आहे.
वयोमर्यादा
यासाठी वयोमर्यादा 18 – 43 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता
अर्ज वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- ४११ ०१८. या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 03 जुलै 2024 पासून होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.pcmcindia.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-यासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.
-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.