PCMC Bharti 2024 : पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरल्या जाणार जागा; बघा पात्रता

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये सध्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज करण्यासाठी तुम्ही इच्छुक असाल तर दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती अंतर्गत “सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक” पदांच्या एकूण 327 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करणयाची शेवटची तारीख 16 एप्रिल 2024 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 पासून सुरु होईल.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी एच.एस.सी- डी.एड, बी.एस.सी- बी.एड. झालेले उमेदवार अर्ज करू शकतात.

महत्वाच्या तारखा

यासाठी अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून, अर्ज 16 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

वरील पदांसाठी अर्ज समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

या भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट https://www.pcmcindia.gov.in/ ला भेट देऊ शकतात.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा सादर करायचा आहे, अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-अर्ज प्रक्रिया 01 एप्रिल 2024 पासून होईल तर अर्ज 16 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe