PCMC Bharti 2024 : तुमच्याकडे ‘ही’ पदवी असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मिळवा 30 हजाराची नोकरी!

Ahmednagarlive24 office
Updated:
PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. यासाठी अर्ज सादर करण्यासाठी काहीच वेळ शिल्लक असून, ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती अंतर्गत “समुपदेशक” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 असून, देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल / समुपदेशन मानसशास्त्रात नियमित पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार पात्र असतील.

वयोमर्यादा

या पदासाठी शैक्षणिक पात्रता 35 वर्षे इतकी आहे. यापुढील उमेदवार येथे अर्ज करण्यास पात्र नसतील.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.pcmcindia.gov.in/ ला भेट द्या.

वेतन

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 30,000/- रुपये पगार मिळेल.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 02 एप्रिल 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

-अर्जामध्ये माहिती पूर्ण भरलेली असावी, अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe