अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी २६० क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची सर्वाधिक ६१ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ३१ क्विंटल आवक झाली होती.
मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपये भाव मिळाला. संत्र्यांची अडीच क्विंटल आवक झाली होती. संत्र्यांना प्रतिक्विंटल २००० ते १० हजार रुपये भाव मिळाला. पपईची १४ क्विंटल आवक झाली होती.

पपईला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अननसाची साडेचार क्विंटल आवक झाली होती. अननसाला प्रतिक्विंटल १६०० ते ५००० रुपये भाव मिळाला. सफरचंदाची साडेपाच क्विंटल आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल ११ हजार ते २३ हजार रुपये भाव मिळाला.