अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर फळांची मोठी आवक, जाणून घ्या फळांचा आजचा बाजारभाव?

Published on -

अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर फळांच्या बाजारात तेजी दिसून आली. बाजार समितीत एकूण ३२८ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाला प्रतिक्विंटल २३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी, ४ जुलै रोजी डाळिंबांची ६४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची १७ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ६ हजार रुपये भाव मिळाला. हापूस आंब्यांची २ क्विंटलवर आवक झाली होती.

हापूस आंब्यांना प्रतिक्विंटल ४००० रुपये भाव मिळाला. बदाम आंब्याची १ क्विंटलवर आवक झाली होती. बदाम आंब्यांना प्रतिक्विंटल २५०० रुपये भाव मिळाला. तोतापुरी आंब्यांची २५ क्विंटल आवक झाली. तोतापुरीला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये भाव मिळाला. दशेरी आंब्याची ३२ क्विंटल आवक झाली होती.

दशेरी आंब्यांना प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये भाव मिळाला. गावरान आंब्याची २ क्विंटल आवक झाली होती. गावरान आंब्यांना प्रतिक्विंटल १००० रुपये भाव मिळाला. निलम आंब्यांची १ क्विंटलवर आवक झाली होती. निलम आंब्यांना प्रतिक्विंटल २००० रुपये भाव मिळाला.

ड्रॅगन फ्रूटला मिळाला ११ हजार रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी जांभळाची १२ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी जांभळाला प्रतिक्विंटल ३००० ते १३००० रुपये भाव मिळाला. केळीची १९ क्विंटल आवक झाली होती. केळीला प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची २८ क्विंटल आवक झाली होती. ड्रॅगन फुटला प्रतिक्विंटल ४००० ते ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मालिका आंब्याची २७ क्विंटल आवक झाली होती. मालिका आंब्यांना ४००० ते ७००० रुपये भाव मिळाला.

सफरचंदाला २३५०० रुपयांपर्यंत भाव

पपईची २४ क्विंटल आवक झाली होती. पपईला ८०० ते २५०० रुपये भाव मिळाला. अननसाची ५ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी अननसाला प्रतिक्विंटल १६०० ते ५००० रुपये भाव मिळाला. सफरचंदाची २ क्विंटल आवक झाली होती. सफरचंदाला १० हजार ते २३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची ४६ क्विंटल आवक झाली होती. पेरूला १ हजार ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. कलिंगडाची १२ क्विंटलवर आवक झाली होती. कलिंगडाला प्रतिक्विंटल ३०० ते ७०० रुपये भाव मिळाला.

रताळ्याची आवक वाढली

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रताळ्याची ३३४ क्विंटल आवक झाली होती. रताळ्याला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. बाजार समितीत भाजीपाल्याची २१९४ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक बटाट्याची ५६७ क्विंटल आवक झाली होती. यावेळी बटाट्याला १४०० ते २५०० रुपये भाव मिळाला. दरम्यान उपवासासाठी आवश्यक असलेल्या रताळे व बटाट्याच्या बाजारभावात वाढ झाल्याचे शुक्रवारी लिलावातून दिसून आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!