अहमदनगर Live24 टीम, 07 एप्रिल 2022 Krushi news :- इच्छाशक्ती असल्यावर माणूस काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण आपल्याला मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव या गावात मनकर्णाबाई रामराव डोईफोडे या 84 वर्षांच्या आजीबाई कडून शिकले पाहिजे.
मनकर्णाबाई यांचे पती रामराव डोईफोडे यांचे 1972 साली आजारामुळे त्रस्त असल्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर मुलांचे संगोपन करण्याचा भार त्यांच्यावर पडला होता.

त्यात भाऊबंदकीमधून त्यांच्या वाट्याला 5 एकर इतकी जमीन आली. त्यात खचून न जाता त्यांनी स्वतः च कंबर कसून कुटुंबाचा आर्थिक भार पेलण्यासाठी याच शेतीत शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी आपल्या शेतातील कष्टच्या जोरावर 5 एकर क्षेत्रापासून आज 30 एकर शेती आपल्या नावे केली आहे. आता त्याचे वय तब्बल 84 वर्ष आहे.तरी देखील त्या आपल्या शेतात काम करत आहेत.
आजीबाई त्यांच्या शेतामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, रब्बी हंगामाला हरभरा, गहू, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला यांसारखी पिके घेत आहेत. त्यांची जमीन केळी पिकासाठी योग्य असल्यामुळे केळीचे पीक देखील आज्जी घेतात.
तर निव्वळ केळीचे उत्पादन त्यांनी घेतले नसुन केळीच्या पिकांमधून त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन
आजीबाईंना 2002 साली महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने नऊ हजार रुपयांचे प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते.
आजून ही आजीबाई आपल्या शेतात काबाडकष्ट करून देखील ठणठणीत आहेत. त्यांना साधा आजपर्यंत चष्मा देखील लागलेला नाही. त्यामुळे त्यांचे सर्वांनाच कौतुक वाटते. आजीबाईंनीने आयुष्यात घालवलेला संघर्षमय प्रवासाचे आज चीज झाले आहे.













