Ahilyanagar market : डाळिंबाचे दर गगनाला भिडले! बाजारात मिळतोय तब्बल १८ हजारांचा दर!

Published on -

Ahilyanagar market : अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी ३५४ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची ३६ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

दरम्यान, कालच्या तुलनेत डाळिंबांच्या भावात १ हजारांनी वाढ झाली आहे. मोसंबीची ५ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ७००० रुपये भाव मिळाला.

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शनिवारी पपईची १७ क्विंटल आवक झाली होती. पपईला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. अननसाची ३ क्विंटल आवक झाली होती.

अननसाला प्रतिक्विंटल २००० ते ५००० रुपये भाव मिळाला. सफरचंदाची ४ क्विंटल आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल १० हजार ते २३ हजार ५०० रुपये भाव मिळाला.

पेरूची २४ क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल १००० ते ५००० रुपये भाव मिळाला. नारळाची २ क्विंटल आवक झाली होती. नारळाला प्रतिक्विंटल २ हजार रुपये भाव मिळाला. बदाम आंब्यांची २ क्विंटल आवक झाली होती. बदाम आंब्यांना प्रतिक्विंटल २००० रुपये भाव मिळाला.

तोतापुरी आंब्याची १५९ क्विंटलवर आवक झाली होती. तोतापुरी आंब्यांना १३०० ते ३५०० रुपये भाव मिळाला. दशेरी आंब्याची सव्वाक्विंटल आवक झाली होती. दशेरी आंब्यांना प्रतिक्विंटल ४००० रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची ७८ क्विंटल आवक झाली होती. ड्रॅगन फ्रूटला प्रतिक्विंटल २ हजार ते ६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला

जांभळाची ५ क्विंटलवर आवक झाली होती. जांभळाला प्रतिक्विंटल ३००० ते १२००० रुपये भाव मिळाला. खजुराची ५ क्विंटलवर आवक झाली होती. खजुराला प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. केळीची ६ क्विंटलवर आवक झाली होती. केळीला प्रतिक्विंटल १६०० ते २००० रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!