आंबा घेताय पण तो गोड आहे की आंबट..? अगदी सोप्पा ट्रिक्सने तुम्हाला आंब्यातील गोडवा कळेल

Published on -

सध्या आंब्याचा हंगाम आहे. बाजारात आंबे दाखल झाले आहेत. आंबा आवडत नाही, असा किमान महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही. आंब्याचा हंगाम उन्हाळ्यात येतो, ज्याची लोक वर्षभर वाट पाहतात. पण जेव्हा आपण आंबे खरेदी करण्यासाठी बाजारात जातो तेव्हा चुकीचे आंबे खरेदी करून आपली फसवणूक होते. जर तुम्हालाही गोड आणि रसाळ आंब्यांचा आस्वाद घ्यायचा असेल, तर काही खास टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.

आंब्याचा रंग बघा

पिकलेल्या आंब्याचा रंग नेहमीच सारखा नसतो. काही आंबे पिवळे असतात. काही हिरवे असतात. काही लाल किंवा नारिंगी असतात. रंग पाहून पूर्णपणे अंदाज लावणे कठीण आहे. परंतु जर आंब्याचा रंग थोडा गडद आणि चमकदार दिसत असेल तर ते पिकल्याचे लक्षण असू शकते. हलक्या आणि फिकट रंगाचे आंबे कच्चे असू शकतात.

आंब्याचा वास घ्या

आंब्याचा वास घेणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. पिकलेल्या गोड आंब्यांना एक विशिष्ट प्रकारचा गोड वास असतो. आंबा नाकाजवळ आणा आणि त्याचा वास घ्या. जर तुम्हाला छान गोड वास येत असेल, तर तो आंबा गोड आहे, असे समजा. विशेषतः देठाजवळून गोड आंब्याचा विशिष्ट वास येतो. जर सुगंध नसेल किंवा थोडासा कच्चा वास येत असेल तर तो घेऊ नका.

थोडा नरम पहा

आंबा हलके दाबून पहा. जर ते थोडे मऊ वाटत असेल, पण दाबल्यावर घट्ट वाटत नसेल, तर ते पिकलेले असू शकते. खूप कडक आंबा कच्चा राहील आणि खूप मऊ आंबा आतून खराब होऊ शकतो. काळजी घ्या, जास्त दाबू नका, नाहीतर आंबा खराब होईल.

आंब्याचे वजन पहा

गोड आंबे अनेकदा थोडे जड वाटतात. जर दोन सारख्या दिसणाऱ्या आंब्यांपैकी एक जड वाटत असेल तर तो निवडा. हे त्यात रस आणि गोडवा असल्याचे लक्षण असू शकते. खूप लहान आणि हलके आंबे बहुतेकदा कमी गोड असतात.

घेताना देठही पहा

आंब्याच्या देठाकडे काळजीपूर्वक पहा. जर देठ कोरडे किंवा काळे पडले असेल तर आंबा आतून कुजलेला असू शकतो. हिरवा आणि ताजा दिसणारा देठ हा चांगल्या आंब्याचे लक्षण असू शकतो. विशेषता आंबा पिकला आहे की नाही हे त्याच्या देठावरुनच कळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe