अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०१५ क्विंटल भाजीपाल्याची आवक, जाणून घ्या भाजीपाल्याचे सविस्तर दर?

Published on -

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाल्याची २०१५ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ३८४ क्विंटल टोमॅटोची आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला ८०० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठ दिवसांपासून टोमॅटोच्या भावात वाढ होत असल्याचे दिसून आले. बटाट्याची ३७१ क्विंटलवर आवक झाली होती. बटाट्याला प्रतिक्विंटल ९०० ते २००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. वांग्याची ९८ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना ८०० ते ३००० रुपये भाव मिळाला.

अहिल्यानगर बाजार समितीत काकडीची १२२ क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते १८०० रुपये भाव मिळाला. गवारीची ११ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ४००० ते १४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लॉवरची १०२ क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला ३०० ते २००० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची १७ क्विंटल आवक झाली होती.

घोसाळ्याला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची ३९ क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. कारल्याची ५३ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल १००० ते ४००० रुपये भाव मिळाला. भेंडीची ६४ क्विंटलवर आवक झाली होती.

भेंडीला प्रतिक्विंटल ८०० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोबीची १३० क्विंटल आवक झाली होती. कोबीला प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपये भाव मिळाला. वालाची १९ क्विंटल आवक झाली होती. वालाला १५०० ते ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. घेवड्याची २८ क्विंटलवर आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटल १००० ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. गाजराची २० क्विंटलवर आवक झाली होती. गाजराला प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये भाव मिळाला.

हिरव्या मिरचीला ७ हजार रुपयांपर्यंत भाव

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी हिरव्या मिरचीची ११९ क्विंटलवर आवक झाली होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ७००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लसणाची २८ क्विंटल आवक झाली होती. लसणाला प्रतिक्विंटल ४००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेवग्याची ९६ क्विंटलवर आवक झाली होती. शेवग्याला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. लिंबांची २१ क्विंटल आवक झाली. लिंबाला प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

मेथीला १० रुपये, तर कोथिंबिर जुडीला ५ रुपये भाव

मेथीच्या ७ हजार ९९२ जुड्यांची आवक झाली होती. मेथी जुडीला ४ ते १० रुपयांपर्यंत भाव मिळाला. कोथिंबिरीच्या ५ हजार १५६ जुड्यांची आवक झाली. कोथिंबिरीच्या जुडीला २ ते ५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. शेपूच्या ४१०६ जुड्यांची आवक झाली होती. यावेळी शेपू जुडीला ४ ते ६ रुपयांपर्यंत भाव मिळाला. पालकच्या ६१५ जुड्यांची आवक झाली होती. पालक जुडीला ४ ते ७ रुपये भाव मिळाला. विविध पालेभाज्यांच्या १८ हजार ४२४ जुड्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणल्या होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!