शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना रासायनिक व सेंद्रिय खते मिळणार

Ahmednagarlive24 office
Published:

 Agricultural News : शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून आता शेतकऱ्यांना रासायनिक व सेंद्रिय खते मिळणार आहेत. सन २०२३ – २४ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे,

या बाबीऐवजी रासायनिक व सेंद्रिय खते देणे, ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.

मंत्री भुमरे म्हणाले, भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरताचे अनुदान केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय योजना प्रतिथेंब अधिक पीक या योजनेतून अदा करण्यात येत होता.

तसेच शेतकऱ्यांना इतर योजनांमधून ठिबक सिंचन संचाचा लाभ होत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, या बाबीऐवजी आता ‘खते देणे ही बाब समाविष्ट करण्याची तसेच सुधारित केलेल्या मापदंडांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत शासन अनुदानित बाबींच्या प्रति हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजुरी देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe