अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी भावामध्ये मोठा फरक

Published on -

Maharashtra News : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा खरेदी भावामध्ये दोन्ही जिल्ह्याच्या दरात वेगवेगळी तफावत होत असल्याची तक्रार शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली होती.

या तक्रारीची तात्काळ दखल घेत खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंढे व पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे दोन जिल्ह्यातील कांदा भागात वेगवेगळी तफावत का करण्यात आली तसेच एन. सी.सी. एफकडून खरेदी होत असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदीच्या दरातील तफावत थांबविण्याची मागणी केली.

अखेर राज्य सरकारने खासदार लोखंडे यांच्या तक्राराची दखल घेत एन. सी. सी. एफचे चेअरमन यांच्याकडे हा प्रस्ताव पाठविला व दोन्ही जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सारखाच भाव मिळण्याची मागणी खासदार लोखंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

एन.सी.सी. एफ यांच्या मार्फत अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला जात असून नाशिक जिल्ह्यात कांद्यास २४.०३ पै. प्रति किलो, असा दर असून अहमदनगर जिल्ह्यात २०.७५ पै. प्रति किलो दर आहे.

दोन्हीही जिल्ह्यातील कांदा खरेदी दरात मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील कांदा खरेदीत एकाच दर निश्चित करावा, अशी मागणी खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe