अहिल्यानगर : जिल्ह्यात आतापर्यंत ९४.२ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ७४ हजार ६८६ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७४ हजार ७२१ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४०.४ मिमी पावसाची नोंद झाली. मागील दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, ६जून महिन्यात आठ दिवस, तर जुलै महिन्यात ९ दिवस पाऊस झाला. पावसातील खंडामुळे खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात ३० टक्क्यांनी घट येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी जुलैपर्यंत ३३१.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यावर्षी १९१ मिमी पाऊस कमी झाला. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत १८६.५ टक्क्यांनी पावसाची तूट झाली. तर वार्षिक सरासरीच्या ६५.३ मिमी पावसाची तूट आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये आतापर्यंत ६ लाख ७४ हजार ६८६ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात १०१५५ हेक्टरवर भात पिकाची लावणी झाली. ५८ हजार २७४ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली.
मका पिकाची ९ लाख ९९ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीची ६७ हजार ६२५ हेक्टरवर पेरणी झाली. मुगाची ४८ हजार १९ हेक्टरवर पेरणी झाली. उडीद ६७ हजार ४९४ हेक्टर पेरणी झाली. भुईमूग ४५३९ हेक्टर, तर सूर्यफूलाची ४३ हेक्टरवर पेरणी झाली. सोयाबीनची सर्वाधिक ९ लाख ७४ हजार ७२९१२ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची १ लाख ३८ हजार ४११ हेक्टरवर लागवड झाली.
संगमनेर व अकोले तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेला आहे. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून माहिती दिली जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात २९ जुलेअखेर १४०.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जून आणि जुलै महिन्यात फक्त १६ दिवस पाऊस झाला. जूनमध्ये ८०.१ मिमी, तर जुलैमध्ये ६०.४ मिमी पाऊस झाला. मागील वर्षी २०२४ मध्ये जूनमध्ये १७७.३ मिमी, तर जुलैमध्ये १५४.४ मिमी असा ३३१.७ मिमी पाऊस झाला. दोन महिन्यात पावसाचे दिवस 3४ होते. गतवर्षीच्या तुलनेत १९१.३ मिमी पावसाची तूट झाली असून सरासरीच्या तुलनेत ६५ मिमी कमी पाऊस झाला.