Custard Apple Farming ;मित्रांनो देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात फळबाग (Orchard) लागवड केली जाते. आपल्या राज्यात बहुतांशी शेतकरी फळबाग पिकाकडे आता मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. फळबाग पिकांपैकी प्रमुख असलेल्या सीताफळाची देखील (Custard Apple Cultivation) आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात आता शेती केली जाऊ लागली आहे.
विशेष म्हणजे या पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर ठरत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सिताफळचे वनस्पतिक नाव अनोना स्क्वैमोसा (Anona squamosa) आणि हे पीक अनोनेसी (Annonaceae) कुटुंबात येते. सीताफळ श्रीमंत आणि गरीब सर्वांचे आवडते फळ आहे.
सीताफळ झाड पानझडी, सहनशील, 5.6 मी उंच वाढते. सिताफळ कोरड्या, डोंगराळ, खडकाळ जमिनीत सहज वाढू शकते. खरं पाहता सीताफळ अमेरिकेतून भारतात आले आहे. भारतातील सर्व राज्यामध्ये सिताफळाची शेती केली जाते.
मात्र असे असले तरी याची शेती विशेषतः आपल्या महाराष्ट्र राज्यात, आसाम, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये केली जाते. याच्या फळामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स आढळतात, जे आपल्या शरीराला विविध आजारांपासून वाचवतात. यामुळे सिताफळास बारामाही मागणी असते.
सिताफळ पिकासाठी आवश्यक जमीन
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, सीताफळाची लागवड भारतात जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. असे असले तरी चिकणमाती असलेली शेतजमीन याच्या शेतीसाठी सर्वात योग्य मानली जाते, कारण की या जमिनीत पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था असते. याशिवाय कृषी तज्ञांच्या मते ज्या शेतजमिनीच्या मातिचा pH मूल्य 6.5-7.5 च्या दरम्यान असतो अशा जमिनीत याची शेती केल्यास दर्जेदार उत्पादन मिळवले जाऊ शकते.
सिताफळ लागवड कशी करावी m
सीताफळची लागवड करण्यासाठी उन्हाळ्यात 4×4 मी. च्या अंतराने 60×60 सेमी रुंद आणि 80 सेमी खोल खड्डा खणणे त्यानंतर प्रत्येक खड्ड्यात 10 किलो चांगले कुजलेले शेण/गांडुळ खत, 100 ग्रॅम डीएपी, 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि 30 ग्रॅम क्लोरोपायरीफॉस. वाळवी नियंत्रणासाठी 10% भुकटी जमिनीत मिसळा आणि लागवडीच्या दहा दिवस आधी खड्ड्यात भरा.
तण नियंत्रण
वेळोवेळी खुरपणी, निंदनी करत राहावे असा सल्ला कृषी तज्ञ देत असतात. यामुळे झाडांच्या आजूबाजूच्या स्वच्छतेबरोबरच झाडांच्या मुळांना हवा, पाणी, प्रकाश यांचा चांगला वापर करता येईल.
सिंचन
रोप लावल्यानंतर लगेच रोपांना पाणी द्या, जरी सीताफळाच्या झाडांना खूप कमी सिंचनाची आवश्यकता असते. तरीही आठवड्यातून एकदा आणि हिवाळ्यात 15-20 दिवसांतून एकदा पाणी दिल्यास झाडाचे उत्पादन आणि वाढ सुधारते. बियाणे मार्फत लागवड केलेले झाडे 3.4 वर्षात फळ देण्यास सुरुवात करतात आणि बडींगद्वारे तयार केलेली झाडे 2-3 वर्षात फळे देण्यास सुरुवात करतात. त्यामुळे फळांच्या वेळी सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत एकदाच पाणी द्यावे.