अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान ! शेतकरी अर्थिक अडचणीत

Published on -

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले तसेच ऊस तोडणी मजुरांच्या कोप्यात पाणी शिरले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मागील सलग तीन ते चार दिवसांपासून चांदा परिसरात अवकाळी पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या तुरी पूर्णपणे झोपल्या असून गहू, हरभरा, कांद्याचे पीके वाया गेले. कापसाच्या वाती झाल्यामुळे शेतकरी अवकाळी पावसाने अर्थिक अडचणीत सापडला आहे.

चांदा-रस्तापूर शिवारातील गट नंबर २३७ व २३८ मधील प्रगतशील शेतकरी रमेश त्रिंबक दहातोंडे यांच्या शेतातील मागील वर्षी गव्हाचे व कापसाचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्याचा शासन स्तरावर पंचनामा झाला होता. परंतु शासनाने नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केली, असे दहातोंडे यांनी सांगितले.

ऊस तोडणी मजुरांच्या कोप्यात पाणी शिरले. त्यांचे देखील मोठे हाल झाले. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe