Dragon Fruit Cultivation: ड्रॅगन फ्रुट लागवडीतून वर्षाला 10 लाख रुपये कसे कमावता येतात? वाचा ए टू झेड महत्वाची माहिती

Ajay Patil
Published:

Dragon Fruit Cultivation :- शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळले असून पारंपारिक पिकांना बगल देत फळबाग आणि वेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहे. यामध्ये प्रामुख्याने जर आपण फळबागांचा विचार केला तर  अनेक प्रकारचे फळबागा महाराष्ट्र मध्ये लागवड केले जात असून यामध्ये गेल्या चार ते पाच वर्षापासून विचार केला तर ड्रॅगन फ्रुट ची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

हे एक वैशिष्ट्यपूर्ण फळ असून एकदा लागवड केल्यानंतर तुम्ही ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून दीर्घकाळासाठी आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात. या अनुषंगाने या लेखांमध्ये आपण ड्रॅगन फ्रुट लागवडीविषयी महत्त्वपूर्ण अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

 ड्रॅगन फ्रुटची लागवड कशा पद्धतीने केली जाते कधी करतात?

ड्रॅगन फ्रुटचे जर चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर याकरिता कलम केलेल्या रोपांची लागवड करणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही कलम केलेली रोपे लावली तर त्यांना वाढण्याकरिता कमीत कमी कालावधी लागतो. साधारणपणे लागवड करायची असेल तर एप्रिल ते जुलै या महिन्याच्या दरम्यान केली तर ते चांगले असते. परंतु काही कारणास्तव जर तुम्हाला या कालावधीत लागवड करणे अशक्य झाले तर तुम्ही दुसऱ्या हंगामात लागवड करू शकतात.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे ड्रॅगन फ्रुट ची लागवड तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये सहजपणे करू शकतात व चांगले उत्पादन घेऊ शकतात. फक्त जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी.तसेच नियमितपणे तुम्ही अंतर्मशागत केली आणि पाण्याची गरज ओळखून सिंचनाची व्यवस्था उत्तमपणे ठेवली तरी पुरेसे आहे. ड्रॅगन फ्रुट ची लागवड ही प्रामुख्याने सिमेंटच्या खांबांचा आधार घेऊन केली जाते. कारण ड्रॅगन फ्रुट ची जे काही झाडे असतात ते वेलीसारख्या वाढतात व त्यामुळे त्यांना आधार मिळावा म्हणून सिमेंटचे खांब खूप गरजेचे असतात.

यामध्ये एका खांबांच्या आधाराला तुम्ही तीन ते चार रोपांची लागवड करू शकतात. लागवड केल्यानंतर जेव्हा ड्रॅगन फ्रुटची रोपे वाढायला लागतात तेव्हा त्यांना एका दोरीने बांधले जाते व दीड वर्षानंतर त्यांची व्यवस्थित अशी वाढ होते व दुसऱ्या वर्षापासून साधारणपणे तुम्हाला उत्पादन मिळण्यास सुरुवात होते.

परंतु दुसऱ्या वर्षामध्ये मिळणारे उत्पादन कमी असते व त्या तुलनेने तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला चांगले उत्पादन मिळायला लागते. यामध्ये जर तुम्ही कंपोस्ट खतांचा व सेंद्रिय खतांचा वापर केला तर उत्पादन खूप चांगले येते व अशी खते ही रोपाच्या मुळाच्या जवळ जमिनीमध्ये चांगली मिसळून द्यावीत. तसेच तापमान हे 10° पेक्षा कमी आणि 40° च्या दरम्यान असेल तर ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन खूप चांगले येते.

 वर्षाला तुम्ही अशा पद्धतीने कमवू शकता दहा लाख

समजा तुम्हाला ड्रॅगन फ्रुट शेती करायचे आहे तर त्याकरिता मोठ्या प्रमाणात सुरुवात न करता अगोदर फक्त शंभर ते 200 रोपांची लागवड करावी. याकरिता तुमचा एकूण खर्च एक लाख रुपये पर्यंत येऊ शकतो. जेव्हा तुमचे हे 100 ते 200 झाडांपासून तुम्हाला उत्पादन मिळायला लागेल तेव्हा बाजारातील मागणी यानुसार तुम्ही भविष्यकाळात ड्रॅगनफ्रुट लागवडीचा विस्तार किंवा व्याप्ती वाढवू शकता.

चांगले मार्केटिंग नेटवर्क याकरिता खूप महत्त्वाचे असून तुमच्या आजूबाजूला जर मोठी शहरे किंवा सुपर मार्केट असेल तर अशा ठिकाणी तुम्ही व्यवस्थित मार्केटिंग केली व त्या माध्यमातून जर प्रवेश मिळवला तर एक चांगली संधी शेतकऱ्यांना या माध्यमातून निर्माण होऊ शकते.

समजा तुम्ही एका एकर मध्ये दहा हजार झाडे लावली तर वर्षाला दहा टन फळांचे उत्पादन या माध्यमातून तुम्हाला मिळते. तुम्ही चांगली मार्केटिंग केली तर या एका एकर क्षेत्रातील लागवडीतून दहा लाख रुपये आरामात कमवू शकतात. तसेच ड्रॅगन फ्रुट चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा लागवड केली तर दुसऱ्यांदा याकरिता येणारा खर्च हा जास्त येत नाही व ड्रॅगन फ्रुट चे आयुष्य हे पंचवीस वर्षाच्या असल्याने  दीर्घ काळापर्यंत तुम्हाला ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून पैसा मिळत असतो.

 ड्रॅगन फ्रुटची लागवड का फायद्याची ठरू शकते?

आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ड्रॅगन फ्रुट मध्ये फायबर, फेनोलिक ऍसिड तसेच फ्लेवोनॉड्स आणि एस्कॉर्बिक एसिड मोठ्या प्रमाणावर असते व यामध्ये अँटिऑक्सिडंट देखील असतात. तसेच ड्रॅगन फ्रुटवर प्रक्रिया करणारे अनेक कंपन्या  उभारल्या गेल्यामुळे देखील ड्रॅगन फ्रुटला चांगली मागणी आहे.

यापासून आईस्क्रीम तसेच ज्यूस यासारखे अनेक उत्पादन मिळतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील याचा वापर खूप महत्त्वाचा ठरतो. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे पातळी कमी करण्याकरिता आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी देखील हे महत्त्वाचे आहे. तसेच केस व त्वचेचे आरोग्य व वजन कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त असल्याने याची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ड्रॅगन फ्रुट लागवडीतून शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे पैसा मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe