अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात श्रीगोंद्यातील तिघे जागीच ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Breaking : तळेगाव ढमढेरे- न्हावरा (ता. शिरुर) या महामार्गावर तोडकरवस्ती येथे भरधाव टेम्पोने कारला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यु झाला. मृत श्रीगोंदा तालुक्यातील आहेत.

चुलत बहीण भाऊ आणि सख्या जावांचा मृतामध्ये समावेश आहे. या अपघातात एक मुलगी जखमी असून तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी असलेले हे सर्व नातेवाईकाच्या लग्नानिमित्त श्रीगोंदा येथे आले होते. लग्न सोहळा उरकल्यानंतर पुण्याकडे कारने (एमएच १२ एसयु ५६५९) परत जाताना तळेगाव ढमढेरेजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

हा अपघात रविवारी (दि.३) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. कारमधील राजु अशोक शिंदे (वय २५, रा. आढळगाव), योगिता सुनिल बोरुडे ( वय ३९), अनिता राजु बोरुडे ( वय ४०, दोघीही रा. मांडवगण ) येथील रहिवासी आहेत.

तर किशोरी सुनिल बोरुडे ही मुलगी जखमी झाली. मृतांपैकी राजु आणि योगिता चुलत बहिण भाऊ आहेत तर योगिता आणि अनिता सख्या जावा आहेत. टेम्पोतील श्रीराम बापू मांडे आणि धीरज कांतीलाल लोखंडे जखमी झाले आहेत. याप्रकरणी टेम्पो चालक श्रीराम मांडे विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.