Dragon Fruit Farming: ड्रॅगन फ्रुटची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल; वाचा ड्रॅगन फ्रुटच्या शेतीची ए टू झेड माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Dragon Fruit Farming:मित्रांनो भारतात शेती व्यवसायात (Farming Business) काळाच्या ओघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. हा बदल शेतकऱ्यांसमवेतच (Farmers) देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील अनुकूल संकेत देत असल्याचे तज्ञ स्पष्ट करतात.

शेती व्यवसायात विशेषता पीक पद्धतीत बदल केला तर शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळते. यामुळे आज आपण देखील एका मागणी मध्ये असलेल्या पिकाच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो आज आपण ड्रॅगन फ्रुट शेती (Dragon Fruit Farming) विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया ड्रॅगन फ्रुट शेतीची ए टू झेड माहिती.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, काही वर्षांपूर्वी ड्रॅगन फ्रुट अमेरिका, व्हिएतनाम, थायलंड इत्यादी देशांतून भारतात आयात केले जात असे, मात्र गेल्या काही वर्षांपासून ड्रॅगन फ्रुट ची शेती भारतात केली जाऊ लागली आहे.

विशेष म्हणजे भारतातील वातावरण ड्रॅगन फ्रुट शेती साठी चांगले अनुकूल असल्याने भारतातही आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत आहे. आपल्या देशात गुजरात मध्ये ड्रॅगन फ्रुट ची शेती मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते. गुजरात मध्ये सरकारने त्याला ‘कमलम्’ असे नाव दिले आहे.

फक्त गुजरातच नाही तर देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि आपल्या महाराष्ट्रातही ड्रॅगन फ्रुट ची शेती आता व्यावसायिक स्तरावर केली जाऊ लागली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना चांगला मोठा फायदा देखील होत आहे.

ड्रॅगन फ्रूटची लागवड कधी आणि कशी करावी?
ड्रॅगन फ्रूटचे चांगले दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी बियाणं चांगल्या दर्जाचे असावे असा सल्ला कृषी तज्ञा शेतकर्‍यांना देत असतात. ड्रॅगन फ्रुटचे कलम केलेले रोप लागवड केल्यास त्यापासून लवकर आणि चांगले उत्पादन मिळत असल्याचे सांगितले जाते.

कलम केलेली रोपे पुनर्लागवड केल्यास ड्रॅगन फ्रुट तयार होण्यास कमी वेळ लागतो. कृषी तज्ञांच्या मते, ड्रॅगन फ्रुटची लागवड एप्रिल ते जुलै दरम्यान केली जाते. मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांना काही कारणास्तव या हंगामात लागवड करता आली नाही, तर दुसऱ्या हंगामातही याची लागवड सहज करता येते आणि यापासून चांगले दर्जेदार उत्पादन देखील मिळवले जाऊ शकते.

ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी आवश्यक शेतजमीन
मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, ड्रॅगन फ्रुट शेती साठी कोणत्याही विशिष्ट प्रकारची शेतजमीन लागत नाही. म्हणजेचं याची लागवड भारतातील कोणत्याही प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकते. असे असले तरी मात्र ज्या शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली जाणार आहे त्या जमिनीत कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

लागवडीनंतर नियमित मशागत आणि योग्य खत व्यवस्थापन करणे आवश्यक राहणार आहे. या पिकाला महिन्यातून एकदा पाणी भरणे आवश्यक असते. तज्ञांच्या मते ड्रॅगन फ्रुट शेती साठी ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग करणे सर्वाधिक चांगले असते. यामुळे पाण्याची बचत होते शिवाय उत्पादनात देखील भरीव वाढ होते.

ड्रॅगन फ्रुट शेतीसाठी आवश्यक तापमान
ड्रॅगन फ्रुटची झाडे लेसी असतात म्हणजेच हे एक वेलवर्गीय पीक आहे. त्यामुळे या पिकाला आधार देणे अतिशय महत्त्वाचे असते. याला आधार देण्यासाठी शेतात सिमेंटचे खांब गाडणे आवश्यक आहे. एका खांब्याचा आधार घेत ड्रॅगन फ्रुटची 3-4 झाडे लावता येतात.

रोप वाढल्यावर त्याला दोरीने बांधले जाते. मित्रांनो दीड वर्षानंतर रोप तयार होते. त्याच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे दुसऱ्या वर्षापासून यापासून फळे मिळण्यास सुरुवात होते. असे असले तरी, तिसऱ्या वर्षापासून ड्रॅगन फ्रुटच्या पिकातून चांगले उत्पादन मिळते.

ड्रॅगन फ्रुट शेतीतून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी 10 अंशांपेक्षा कमी आणि 40 अंशांच्या दरम्यान तापमान सर्वोत्तम असल्याचे कृषी तज्ञ सांगत असतात. चांगल्या उत्पादनासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा. कंपोस्ट खत रोपाच्या मुळाजवळ लावले गेले पाहिजे.

वार्षिक 10 लाख रुपयांची होणार कमाई
शेतकरी मित्रांनो सुरुवातीला ड्रॅगन फ्रुटची लागवड 100 ते 200 रोपांची लागवड करावी. यातून चांगले उत्पादन मिळाले की रोपांची संख्या वाढवली जाऊ शकते. बजेटबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीला सुमारे एक लाख रुपये खर्च येईल. जेव्हा तुमचे पीक तयार होते, फळे वाढू लागतात आणि बाजारात मागणी असते, तेव्हा तुम्ही त्याची व्याप्ती वाढवू शकता.

बाजारपेठेत स्थान मिळवणे हे सर्वात आव्हानात्मक काम आहे. ज्याच्याकडे चांगले मार्केटिंग नेटवर्क आहे, मोठ्या शहरांमध्ये आणि सुपर मार्केटमध्ये प्रवेश आहे. त्यांना ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतुन चांगली कमाई होऊ शकते.

जर तुम्ही एक एकर जमिनीत शेती केली तर सुमारे एक हजार झाडे बसवली जातील, त्यातून वर्षाला 10 टन फळांचे उत्पादन होईल. याच्या मदतीने तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत कमाई सहज करू शकता. याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एकदा लागवड केली की पुन्हा जास्त खर्च लागत नाही. दरवर्षी फक्त पिकांची देखभाल करावी लागते. या वनस्पतीचे आयुष्य 25 वर्षांपर्यंत असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe