Drone farming : ड्रोनचा शेतीत वापर फायद्याचा, पण ‘या’ अडचणी येऊ लागल्या आहेत समोर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Drone farming:-  सध्या तंत्रज्ञानात होत असलेल्या बदलांमुळे शेती क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आजचा शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पादन कसे निघेल याकडे जास्त भर देत आहे.

ड्रोनचा शेतीत वापर करून शेतकरी औषध फवारणी करू शकतो. ड्रोनची शेतातील कामाची गरज पाहता शेती क्षेत्रातील ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी या वर केंद्र सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

त्यासाठी सरकारने ड्रोनच्यामधून शेती व्यवसाय सुलभ करण्यासाठी शेतकऱ्यांना जागोजागी ड्रोनची प्रात्याक्षिके करुन दाखवली जात आहेत. तर कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन वापराचे धडे दिले जात आहेत. यादरम्यान शेतकऱ्यांनी एक ना अनेक समस्या उपस्थित केल्या आहेत.

त्यामुळे ड्रोनच्या वापरात काही महत्वाचे बदलही करावे लागणार आहे. ड्रोन मध्ये नेमक्या अडचणी काय? तर
गेल्या काही दिवसांपासून कृषी संस्थाच्या माध्यमातून ड्रोनच्या चाचpण्या घेतल्या जात होत्या. त्यात ड्रोन हा शेतीसाठी हा उत्तम पर्याय असला तरी यामध्ये काही त्रूटीही असल्याचे निदर्शनात आले आहे.

ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणी करतेवेळी ड्रोनच्या हवेमुळे बरेच कीटकनाशकं औषध हवेत उडून जात आहे आणि पानांच्या मागील बाजूस व खोडात जर किडीचा प्रादुर्भाव असेल तर ड्रोनमधून किटकनाशकाच्या फवारणीमुळे त्याचा नायनाट होईल असे नाही.त्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी करुनही शेतकऱ्यांना पुन्हा हाताने फवारणी करण्याची वेळ येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe