Agriculture News : कांद्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी थांबण्याचे नाव घेत नसतानाच कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील राहुल थोरात या शेतकऱ्याने
एक एकरातील कोथिंबीर काढुन टाकण्यासाठी २५० रुपये प्रति महिलेला एक दिवसाचा रोजगार देवून २० महिलांकडून शेत मोकळे करून घेतले. त्यामुळे थोरात यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. कोथिंबिरीचे दर घसरल्यामुळे लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.
अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पन्न घटल्यामुळे त्यांनी तो खोडा ऊस मोडल्यानंतर कोथिंबिरीची निवड केली. कोथिंबीर आल्यानंतर एक एकर कोथिंबीर ही व्यापाऱ्याला वीस हजार रुपयांना दिली. मात्र कांद्याचे जसे बाजार पडले तसेच कोथिंबीरची अवस्था झाली.
व्यापारी येईल या अशाने वाट पाहिली, परंतु व्यापारी काय आलाच नाही. मग शेतात माणस कामाला लावुन कोथिंबीर जागेवर शेतात काढून टाकली. झालेला खर्चही वसूल झाला नाही. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला पिकांच्या दराची दिवसागणिक घसरण होत असल्याचे समोर येत आहे.