Agricultural News : सध्या उष्णता दिवसेंदिवस वाढत असून भाजीपाल्याचे दर स्थिर असले तरी लिंबू तेजीत आहे. कडधान्याची मागणी वाढत असल्याची स्थिती बाजारात दिसून येत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबाला चांगला भाव आला आहे, मागणीही वाढली आहे परंतु आवक घटली आहे.
किरकोळ बाजारात ५ रुपयांना एक लिंबू मिळत आहे. विशेष म्हणजे मागणीच्या तुलनेत बाजारात लिंबू कमी प्रमाणात येत असल्या ने काही दिवसांत भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यावसायिक व्यक्त करत आहेत.

उकाड्यापासून आराम मिळण्यासाठी अनेकांचा कल लिंबू पाणी पिण्याकडे असल्याने लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परंतु उत्पादन घटल्याचे दिसून येत आहे. पर्यायाने किंमतीमध्येही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
उन्हाळ्यात इतर शितपेयांपेक्षा लिंबू सरबत, उसाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. बाजारात मिळणारे कोल्ड ड्रिंक्स आपल्याला काही काळासाठी थंडावा देतात, त्यामुळे तेवढ्यापुरते थंड वाटते पण आरोग्याच्या दृष्टीने ते हानीकारक आहेत
, या ऐवजी लिबू सरबत, कैरीच पन्ह, ताक, उसाचा रस आपण पिऊ शकतो. लिंबू सरबत व उसाचा रस हा कोल्डड्रिंक्ससाठी उत्तम पर्याय आहे.













